राज्यात चार प्रकारातील डाळींच्या साठ्यावर 31 ऑक्टोबरपर्यंत राहणार निर्बंध

डाळ

मुंबई – राज्यात तूर, मसूर, उडीद आणि हरभरा या डाळींच्या साठ्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. तर तूर, मसूर, उडीद आणि हरभरा या डाळीच्या साठ्यावर 31 ऑक्टोबरपर्यंत हे निर्बंध राहतील राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सहसचिव यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. तर या सहसचिव चारुशीला तांबेकर यांनी दिलेल्या अधिसूचनेनुसार केंद्र शासनाने डाळीच्या साठ्यावर घाऊक किरकोळ व्यापाऱ्यांनी मिलरसाठी साठा निर्बंध लागू केले आहे. त्यामुळे राज्यात घाऊक व्यापारी आता डाळींचा ५०० टनापेक्षा जास्त आणि एकाच प्रकारच्या डाळीचा २०० टनापेक्षा जास्त साठा करू शकणार नाहीत असं सांगण्यात आले आहे.

तर केंद्र शासनाने डाळींच्या साठ्यावर घाऊक, किरकोळ व्यापारी आणि मिलर्ससाठी साठा निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्यात घाऊक व्यापारी आता डाळींचा ५०० टनांपेक्षा जास्त आणि एकाच प्रकारच्या डाळींचा २०० टनांपेक्षा जास्त साठा करू शकत नाहीत,” असे सहसचिवांनी आदेशात नमूद केले आहे. किरकोळ व्यापारी ५ टनांपेक्षा जास्त आणि मिलर्सला गेल्या सहा महिन्यांतील उत्पादन किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या ५० टक्के यापैकी जे जास्त असेल त्यापेक्षा जास्त साठा करता येणार नाही.

१९ जुलैअखेर समजा एखाद्याकडे जास्त साठा असल्यास fcainfoweb.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करावा लागणार आहे. डाळीच्या आयातदारांना मात्र साठा निर्बंधाचे आदेश लागू नसतील. मात्र अशा आयातदारांनादेखील संकेतस्थळावर साठा माहिती जाहीर करावी लागेल. राज्य शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न मंत्रालयाने दिला आहे. अतिरिक्त डाळींचा हा साठा येत्या ३० दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत कमी करणे आवश्यक असेल.

महत्वाच्या बातम्या –