पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांसंदर्भात आढावा बैठक संपन्न

सुनिल केदार

पशुसंवर्धन विभागातील विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मंत्रालयात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

एचटीबीटी लागवडप्रकरणी उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना दिला दिलासा

श्री. केदार म्हणाले, राज्यात पशुधन पर्यवेक्षक पदासह इतर अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असून पशुसंवर्धन विभागातील सर्व संवर्गातील रिक्त पदांचा अहवाल पाहून भरती प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येईल. तसेच काही पशुधन विकास अधिकारी गट-ब यांच्या पदोन्नतीबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. राज्यातील पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी या संवर्गातील कर्मचाऱ्यांना कायम प्रवास भत्ता मंजूर करण्यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मोदी सरकारमध्ये काम करू इच्छित नाही अधिकारी?

या बैठकीस आमदार मंजुळाबाई गावित, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, सहाय्यक सचिव माणिक गुट्टे, पशुसंवर्धन पर्यवेक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरण्यासाठी मोफत सामायिक सुविधा केंद्र

जिल्हा यंत्रणांनी एकत्रितपणे साथीच्या आजारांचा प्रतिबंध करावा – एकनाथ शिंदे