मंजूर पदांचा आढावा घेऊन ३० सप्टेंबरपर्यंत एमपीएससीकडे मागणीपत्र पाठवा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश

उद्धव ठाकरे

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांकडून अद्यापपर्यंत मागणीपत्र आयोगाला न सादर झाल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत सर्व विभागांनी  मंजूर पदांचा तात्काळ  आढावा  घेऊन आपले मागणीपत्र आयोगाकडे पाठवावे असे स्पष्ट निर्देश श्री.ठाकरे यांनी सर्व विभागांच्या सचिवांना दिले. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला दुजोरा देत  तातडीने ही कार्यवाही झाली पाहिजे असे सांगितले.

महत्वाच्या बातम्या –