रोहित पवारांनी शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकविम्याची रक्कम मिळवून देण्याचा शब्द पाळला

रोहित पवार

आमदार पवार यांनी कर्जत- जामखेड मतदार संघातील शेतकऱ्यांसह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागील वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकविम्याची रक्कम मिळवून देण्याचा शब्द निवडणुकीपूर्वी दिला होता. त्यानुसार रोहित पवार यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची भेट घेऊन याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; PM किसान सन्मान निधीतल्या लाभार्थ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना सन २०१८ मधील रब्बी हंगामातील पिकविम्याची रक्कम मिळाली नाही. त्यांना आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी वेळ देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मागील वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकविम्याची रक्कम मिळवून देण्याचा शब्द निवडणुकीपूर्वी दिला होता. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे आतापर्यंत ७० टक्के शेतकऱ्यांना त्यांचे अडकलेले पिकविम्याची रक्कमेचा लाभ मिळाला आहे. पण तरीही आधार लिंक न केल्याने किंवा इतर तांत्रिक अडचणींमुळे अजूनही ३० टक्के शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत.

नोंदणीकृत खत विकण्यसाठी कुठलीही मनाई नाही

दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी रोहित पवार यांच्याशी संपर्क साधून यात लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे आणि मुख्य सांख्यिकी उदय देशमुख यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या. कृषी आयुक्तांनीही तातडीने संबंधित विमा कंपनीच्या आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना परत एकदा त्रुटींची पूर्तता करण्याची संधी देण्याचे मान्य केले.

त्यानुसार येत्या काही दिवसांत राहिलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल नंबरवर एक एस.एम.एस येईल. त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन या शेतकऱ्यांना अपुऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा दुसरा हप्ता देण्यासाठी निधी मंजूर

बजाज पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे धनंजय मुंडेंचे आदेश

आठवड्यातील तीन दिवस कृषी सहायकांनी कार्यालयात न बसता गावात जायलाच हवे : कृषिमंत्री

उडीद डाळ वापरून असा बनवा घरी फेसपॅक