‘गुलाब’ चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; राज्यातील ‘या’ भागात तुफान पावसाची शक्यता

पाऊस

मुंबई – राज्यात मागील काही दिवसापासून पावसाने चांगलाच जोर दाराला आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे . तर आता राज्यावर एक संकट येत आहे. गुलाब चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या उत्तर आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकले आहे. हवामान खात्याने रविवारी ही माहिती दिली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारपासून दक्षिण आणि किनारपट्टी भागात पाऊस सुरू झाला आहे. गुलाब चक्रीवादळाचा परिणाम राज्यावर देखील होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांसह मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज असल्याने हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाड्यात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी आहे. तसेच, उद्या 28 रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तेथेही वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी असणार आहे.

‘गुलाब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस  शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील  रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, नाशिक, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, सोलापूर, उस्मानाबाद आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या –