१४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मार्केट यार्डा मधील फूल बाजारात विविध प्रकारच्या गुलाबांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात गुलाबाच्या भावात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. रविवारी म्हणजेच ९ फेब्रुवारी २०२० रोजी घाऊक फूल बाजारात दर्जानुसार गुलाबाच्या २० नगास १६० ते १८० रुपये भाव मिळाला असल्याची माहिती अखिल फूलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली.
जाणून घ्या चंदनाचे अनेक आरोग्यदायी फायदे…
किरकोळ बाजारात एक फूल २० रुपयांना मिळत आहे. मावळ आणि शिरूर तालुक्यातून बाजारात गुलाबांची आवक होत आहे. तसेच सुरत, बडोदा, नागपूर, इंदूर, हैदराबाद, दिल्ली येथे फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ ला आणखी दोन दिवस आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला गुलाबाचा माल राखून ठेवला आहे. सध्या बाजारात मागणी कमी असल्यामुळे शेतकरी गुलाबाची लागवड कमी करत आहेत. नेहमीच्या तुलनेत ७० टक्केच लागवड केली जात असल्याचे प्रसिद्धी प्रमुख सागर भोसले यांनी सांगितले.
पीएम किसान योजनेंतर्गत पीक कर्जासाठी विशेष मोहीम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती https://t.co/hDj0Y7BnnE
— Krushi Nama (@krushinama) February 12, 2020