‘ह्या’ बँकामध्ये बदलणार नियम ; १ फेब्रुवारी पासून होणार अंमलबजावणी !

नियम

बँक म्हणल्यावर आर्थिक व्यवहार आलेच. प्रत्येक व्यक्ती हा बँकेच्या संपर्कात काही ना काही करणास्तव येतच असतो. म्हणून बँकेत होणारे नव नवीन बदलांची माहिती असणे गरजेचेच आहे.

तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) ,आणि बँक ऑफ बडोदा चे ग्राहक असताल ह्या बँकेत तुमची जर खाते असतील तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा पैशांच्या व्यवहाराच्या संबंधित नियमात नवीन बदल करणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया आता १ फेब्रुवारीपासून अधिक शुल्क आकारणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या ग्राहकांना माहिती देताना सांगितले कि १ फेब्रुवारी पासून पैसे ट्रान्सफर करण्यास अधिक मूल्य मोजावे लागतील. वेबसाईट वर जरी केलेल्या तपशिलांनुसार बँकेने व्यवहारांमध्ये एक नवीन स्लॅब जोडला आहे त्याची श्रेणी हि २ लाख ते ५ लाख रुपये एवढी आहे.

म्हणजेच कि तुम्ही १ फेब्रुवारीपासून २ लाख ते ५ लाख रुपयांच्या मध्ये जे व्यवहार करणार आहात… बँक शाखेतून IMPS द्वारे पैसे पाठवणार असाल तर तुम्हाला २० रुपये शुल्क आणि GST सुद्धा भरावा लागणार आहे.

बँक ऑफ बडोदा चे नियम पुढील प्रमाणे असतील
बँक ऑफ बडोदा च्या ग्राहकांना १ फेब्रुवारी पासून चेक क्लिअरन्स च्या नियमात बदल होणार आहेत. म्हणजेच कि चेक पेमेंटसाठी कन्फर्मेशन गरजेचेच असणार आहे. पुष्टी नसेल तर चेक परत केला जाईल. बँक ऑफ बडोदा सांगते कि “CTS क्लिअरिंगसाठी(For clearing) सकारात्मक वेतन प्रणालीच्या सेवेचा लाभ घ्या”

महत्वाच्या बातम्या –