रोज हजार संकटांवर मात करून मार्ग काढणारा बळीराजा आहे – रुपाली चाकणकर

रुपाली चाकणकर

नवी दिल्ली – नव्या कृषी कायद्यांविरोधात उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, राजस्थान, केरळ आणि पंजाबच्या शेतकरी संघटनांनी २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी ‘दिल्ली चलो’ आंदोलनाची हाक दिली होती. यात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत.

शेतकरी आंदोलनाला देशातून पाठिंबा मिळत आहे. सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये सुरू असलेली बैठक काल तोडग्याविना संपली आहे. या बैठकीत कोणताही तोडगा काढण्यात यश आले नाही. नवीन कृषी कायदे रद्द होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, अशी ठाम भूमिका दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतली आहे.

केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवताना अपयशी ठरताना दिसत आहे. यावरूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. ‘रस्ता अडवला म्हणजे मार्ग बंद झाला असेही नाही. सत्तेची मस्ती फार काळ टिकत नसते. रोज हजार संकटांवर मात करत मार्ग काढणारा बळीराजा आहे. त्यामुळं रस्ता खोदून मार्ग अडवला जाईल असला गैरसमज करून घेऊ नका, शेतकरी हुशार आहेत. कोणत्याही विषयावर योग्य मार्ग काढला पाहिजे मात्र केंद्र सरकारचे सध्याचे वागणे म्हणजे म्हैस सोडून पखालीला इंजेक्शन दिल्या सारखा आहे’ ! अशी टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –