महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक

sadabhau khot

एखाद्या राजकीय पक्षानं शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करु, असं जाहीरनाम्यामध्ये म्हटलं असेल तर त्याची अंमलबजावणी करणं अत्यंत गरजेचं आहे. ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक आहे, अशी घणाघाती आरोप माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

ते मुंबई येथे बोलत होते. यावेळी बोलताना खोत म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकारची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिवसाढवळा केलेली फसवणूक आहे. जाहीरनाम्यामध्ये तुम्ही उल्लेख करायला हवा होता की, तुमच्या पीककर्जालाच माफी देऊ, तुम्ही शेतीच्या जोडधंद्याला जे कर्ज घ्याल त्याला आम्ही माफी देणार नाही, असे म्हणत खोत यांनी सरकारला धारेवर धरले.

पुढे बोलताना खोत म्हणाले, ‘आम्ही ही मागणी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत. जे पक्ष आपल्या जाहीरनाम्यामध्ये छापतात आणि निवडून आल्यानंतर त्याची जर ते अंमलबजावणी करणार नसतील तर अशा पक्षांची नोंदणी रद्द केली गेली पाहिजे, अशी मागणी खोत यांनी केली.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या जाहीरनाम्यावर, याचप्रमाणे सरकारने विहाली अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीवर खोत यांनी टीका केलेली आहे. तसेच विरोधी पक्षांनी देखील मोठ्या प्रमाणात सरकारच्या कर्जमाफीवर आरोप केला आहे.

ठाकरे सरकारच्या शपथविधीसाठी झाला ‘इतक्या’ कोटींचा खर्च