fbpx

आज स्वाभिमानाची प्रश्न पत्रिका सोडवायला आलो आहे – सदाभाऊ खोत 

पुणे:  सदाभाऊ खोत हे शेतकरी कर्जमाफी तसेच इतर विषयांमध्ये संघटने विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे. तसेच नजीकच्या काळामध्ये खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये वाद सुरु असल्याच देखील पहायला मिळाल होत . याच सर्व विषयांवर खुलासा करण्यास सदाभाऊ खोत यांना सांगण्यात आलं होतं. आज (दि 21) रोजी सदाभाऊ हे पुण्यामध्ये चौकशी कमिटीला समोर जाणार आहेत. तत्पूर्वी सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र अशा भावना व्यक्त केल्या आहेत. शेतकरी चळवळ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हे माझ्यासाठी विद्यापीठ आहे. आज याच विद्यापीठात मला काही प्रश्नाची पत्रिका सोडवायची आहे अशा भावना पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केल्या आहेत. मी आजपर्यंत संघटनेत काम केलं आहे यापुढे ही संघटनेसाठीच काम करणार असल्याचे ही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं आहे.

हे वाचा- आज नाही तर २१ जुलैला आपली भूमिका स्पष्ठ करणार – सदाभाऊ खोत

Add Comment

Click here to post a comment