उगवण न झालेल्या सोयाबीन पिकांची पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद करणार सदाभाऊ खोत

सदाभाऊ

पुणे – राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ.सदाभाऊ खोत हे शनिवारी (दि१८)रोजी नांदेड जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहे अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी दिली आहे.

जाणून घ्या ओव्याचे ‘हे’आरोग्यदायी फायदे

राज्यातील शेतकरी लॉकडाउनच्या काळात अनेक संकटाला सामोरे जात आहे, गेल्या तीन महिन्यात राज्यात १२०० शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेतकऱ्यांचा कापूस खरेदी अभावी घरातच पडून आहे, कर्ज माफीचा बोजबारा उडालेला आहे, खरीब हंगामासाठी कर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही. बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे पीक उगवले नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. युरिया खताचा कृतिम तुटवडा बाजारात निर्माण करून व्यापारी शेतकऱ्यांना लुटत आहेत.

जाणून घ्या दालचीनीचे हे फायदे

लॉक डाऊनच्या काळात वीज बील वाढीव देण्यात आले आहे,दुधाचे भाव पडले आहेत अशा अनेक समस्येने शेतकरी ग्रासलेला आहे पण सरकार लक्ष द्यायला तयार नाही .रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आ.सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलने झाली पण हे आंधळे व बहिरे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही, त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी सदाभाऊ खोत कोरोना महामारीच्या काळात सुद्धा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ते नांदेड जिल्ह्यातील विविध गावातील शेतकऱ्यांना त्याचा बांधावर जाऊन संवाद साधणार आहेत व लढण्याचे बळ देणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

आरोग्यदायी लवंग खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

दही खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे