मुंबई – “ताऊक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘या’ जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत झाली मोठी घट
- राज्यात तब्बल ५९ हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात तर रिकव्हरी रेटमध्ये झाली मोठी वाढ
- पेट्रोल, डिझेल सोबतच आता खतांच्या दरात वाढ! केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करतंय – जयंत पाटील
- ‘ही’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली भाजी, जाणून घ्या फायदे
- तोक्ते चक्रीवादळाने गती बदलल्याने ‘या’ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान