सलमान ‘भाई’ आणि ‘राणी’ दीपिकाचीच बॉलीवुडवर सत्ता !

मुंबई : 2017-2018 मध्ये दीपिका पादुकोण आणि सलमान खानचीच डिजीटल दूनियेवर सत्ता होती, हे नुकतंच समोर आलंय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, सप्टेंबर 2017 ते सप्टेंबर 2018 ह्या वर्षात डिजीटल न्यूज चार्टवर सर्वाधिक जास्त सलमान ‘भाई’ आणि ‘राणी पद्मावती’ दीपिका पादुकोणचं अग्रणी स्थानी असल्याचं दिसतंय.

स्कोर ट्रेंड्स इंडियाव्दारे प्रसिध्द करण्यात आलेल्या वार्षिक अहवालानूसार, 52 आठवड्यात सलमान प्रथम क्मांकावर होता. तर किंग खान शाहरुख दूस-या स्थानावर, अमिताभ बच्चन तिस-या स्थानी, अक्षय कुमार चौथ्या आणि रणवीर सिंह पाचव्या स्थानी होते. त्याचप्रमाणे 52 आठवड्यांमध्ये दीपिका पहिल्या स्थानी, प्रियंका चोप्रा दूस-या क्रमांकावर, सोनम कपूर तिस-या स्थानी, आलिया भट्ट चौथ्या आणि अनुष्का शर्मा पाचव्या क्रमांकावर होती.

अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्विनी कौल सांगतात,समोर आलेल्या आकड्यांच्यानूसार, 52 आठवड्यांमध्ये, दीपिकाच्या लोकप्रियतेत पद्मावत सिनेमा आणि तिच्या लग्नाविषयीच्या सतत चर्चेत असलेल्या बातम्यांमूळे वाढ झाली. तर बिग बॉस, टायगर जिंदा है, रेस 3, आणि भारत ह्या चित्रपटांच्यामूळे सलमान खान लोकप्रियतेच्या शिखरावर राहिला. गेल्या 52 आठवड्यांमध्ये सलमान खान आणि दीपिका पादुकोणने डिजिटल न्यूज प्लेटफॉर्मवर आपली पकड मजबूत केली.

अश्वनी कौल म्हणतात, “14 भारतीय भाषांमधल्या 500हून अधिक न्यूज वेबसाइटमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीच्याविषयी लिहीलेल्या बातम्यांच्या अनूसार तारे-तारकांची ही लोकप्रियता आम्हांला समजते.“