राष्ट्रवादीचे संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार?

संग्राम जगताप

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत आपला विजय पक्का करण्यासाठी संग्राम जगताप शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मतदारसंघ राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा करत या मतदारसंघात संग्राम जगताप यांना तिकीट दिलं होतं. पण आता हेच संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याने राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार जगताप शिवसेनेत प्रवेश करू शकतात. याबाबत ‘हिंदुस्तान टाईम्स’ या इंग्रजी दैनिकाने वृत्त दिलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

विश्रांतीनंतर पावसाचा जोर उद्यापासून पुन्हा पाहायला मिळणार – हवामान विभाग

आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढणार

Add Comment

Click here to post a comment




Loading…