प्रकाश आंबेडकरांनी एमआयएम सोबत नव्हे तर शिवसेनेसोबत युती करायला हवी होती : राऊत

टीम महाराष्ट्र देशा- वंचित बहुजन आघाडी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी एकत्र आल्याने निवडणूक जिंकू शकत नाहीत अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच प्रकाश आंबेडकरांनी एमआयएम सोबत नव्हे तर शिवसेनेसोबत युती करायला हवी होती असं मतही त्यांनी व्यक्त केलं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत ?

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची युती म्हणजे भाजपची ‘बी टीम’ आहे. वंचित बहुजन आघाडी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत नाही.प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी एकत्र आल्याने निवडणूक जिंकू शकत नाहीत . प्रकाश आंबेडकरांनी एमआयएम सोबत नव्हे तर शिवसेनेसोबत युती करायला हवी होती. प्रकाश आंबेडकर एक हुशार राजकारणी आहेत. दलित नेत्यांमध्ये सर्वात बुद्धिमान नेते आहेत. ते योग्य पावलं टाकत असतात मात्र काही वेळा ती चुकीच्या दिशेने वळण घेतात .