संत एकनाथ सहकारी साखर कारखाना देणार उसाला चांगला भाव

टीम महाराष्ट्र देशा –  संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पश्‍चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्याच्या बरोबरीने उसाला भाव देणार आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपला ऊस संत एकनाथ कारखान्यालाच देऊन सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन तुषार पा.शिसोदे यांनी केले. ते कारखान्याच्या वतीने चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाच्यावतीने आयोजित गाव व गटनिहाय कार्यक्रमात तालुक्यातील ऊस ऊत्पादकांशी ते बोलत होते. कारखान्याचा 2017-18 चा गळीत हंगाम लवकरच सुरुहोत आहे. पाटेगाव गटातील पाटेगाव, कावसान,सायगाव,दादेगाव येथील ऊस उत्पादकांशी चर्चा केली.