SBI Recruitment | भारतीय स्टेट बँक यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

SBI Recruitment | भारतीय स्टेट बँक यांच्यामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

टीम महाराष्ट्र देशा: बँक परीक्षेची (Bank Exam) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय स्टेट बँक (SBI) सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या पदांबद्दल इच्छुक उमेदवारांनी अधिक माहिती मिळवण्यासाठी sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

विविध पदांच्या 65 रिक्त जागा

भारतीय स्टेट बँक यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 65 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये सर्कल सल्लागार आणि व्यवस्थापक पदांच्या जागा आहेत. तरी, पदानुसार पात्रधारक उमेदवार या रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

शैक्षणिक पात्रता

भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 65 जागा भरण्यासाठी पदांनुसार पातधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी पदांनुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. तरी पदानुसार इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख

दिनांक 22 नोव्हेंबर 2022 पासून ते दिनांक 12 डिसेंबर 2022 पर्यंत SBI च्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रधाराक उमेदवार अर्ज करू शकतात.

महत्वाच्या बातम्या