कोरोना वाढल्याने शाळा पुन्हा बंद? शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाले कि..

वर्षा गायकवाड

पुणे – माघील काही आठवड्यांपासून कोरोना(Covid) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार सतर्क झाले असुन कोरोनाच्या चोथ्यालाटेला थांबवण्यासाठी सरकार पूर्ण तयारीत उतरली आहे. केंद्रातून पत्र आले असून सर्व राज्यांना सतर्क राहून परिस्थिति नुसार निर्णय घेण्यास सांगितले आहे. सध्या राज्यात मास्क सक्ती नसली तरी कोरोना(Covid) रुग्णसंख्या सातत्याने वाढत राहिल्यास सरकार पुन्हा एकदा मास्क सक्ती लावू शकते.

महाराष्ट्रात १३ जून पासून उन्हाळी सुट्या नंतर शाळेची घंटा वाजणार आहे. मात्र सध्या कोरोना(Covid) रुग्णसंख्याचा प्रत्येक दिवशी नवीन आकडा समोर येत आहे. त्यामुळे यंदा शाळा सुरु होणार कि नाही याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Education Minister Varsha Gaikwad) म्हणाल्या कि, ‘राज्यात पुन्हा एकदा कोरोना(Covid) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शाळेत SOP चालू करण्यात येईल. शाळेत मास्क सक्ती करावी कि नाही यावर आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड(Education Minister Varsha Gaikwad) म्हणाले.

माघील २ वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तरी शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या साठी काही योजना नियम आखणार आहोत,शाळांना खबरदारी घेण्याचे आदेश देऊन आपण शाळा सुरु करत आहोत असे हि ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –