राज्यातील शाळा ‘१५’ जूनलाच सुरू होणार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा!

शाळा

मुंबई –  माघील २ वर्षांपासून जग कोरोनाशी लढत आहे, कोरोना आजारामुळे सर्व काही ठप्प पडले होते त्यात  शाळा आणि कॉलेजेस बंद करण्यात आले होते. मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिलं जात होतं. बहुतेक विद्यार्थ्यांच्या परीक्षाही ऑनलाईन पार पडले. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाची समाधानकारक स्थिती पाहता, आता हळूहळू पाऊले टाकत शाळा आणि कॉलेजेस सुरु करण्यात आल्या आहेत. आता राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(School Education Minister Varsha Gaikwad) यांनी उन्हाळ्याच्या सुटीनंतर शाळा पुन्हा सुरु होण्याच्या तारखेची घोषणा केली आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु होणार असल्याचे घोषणा सुरु केलं आहे. राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरु होणार आहेत. तर 13 जूनला फक्त पहिलीच्या वर्गासाठी पहिलं पाऊल हा कार्यक्रम होणार आहे. अन्य शाळा १५ जूनला सुरू होणार आहेत.

हे पण वाचा – कोरोना वाढल्याने शाळा पुन्हा बंद? शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाले कि.

मागील काही दिवसात संपूर्णपणे कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता पुन्हा एकदा हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शाळा पुन्हा सुरु होणार की नाही या बाबत शंका निर्माण झाली होती. मात्र शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे शाळा सुरु होणार हे निश्चित झाले आहे.

महत्वाच्या बातम्या –