‘या’ जिल्ह्यातील शाळा 13 डिसेंबर पर्यंत राहणार बंद

शाळा

पुणे : काेराेनाचा पुन्हा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीकाेनातून पुण्यातील सर्व शाळा 13 डिसेंबर पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी दिली आहे. 13 डिसेंबरला काेराेनाचे सद्यस्थितीचा आढावा  घेऊन आणि  पालकांशी चर्चा करुन पुढे शाळा कधी सुरु करावयाचे याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुणे शहरातील शाळा 23 नाेव्हेंबर राेजी सुरु करण्याचे नियाेजीत हाेते व त्यादृष्टीने प्रशासनातर्फे सर्व तयारी करण्यात आली हाेती. परंतु मागील काही दिवसात पुणे शहरातील काेराेना रुग्णांची वाढती संख्या, केंद्रीय पथकाने दुसऱ्या लाटेचा दिलेला अंदाज याबराेबरच शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्या संर्दभात पालकांचा अत्यल्प प्रतिसाद या सर्वांचा विचार करुन लहान मुलांचे आरोग्याचा प्रश्न पुढील काळात वाढू नये याकरिता 13 डिसेंबर पर्यंत शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त  व इतर संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करुन पुणे मनपाने हा निर्णय घेतला आहे.. राज्यातील इतर शहरात 31 डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. यापार्श्वभूमीवर पुण्यातील नागरिक, पालकांची शाळा बंद ठेवण्याची मागणी हाेती त्यामुळेच हमीपत्रांना कमी प्रतिसाद मिळाला. पाच ते दहा टक्के ही प्रतिसाद मिळाला नाही. ज्यांचे करिता सर्व काही नियाेजन करण्यात येते, त्यांची इच्छा नसेल त्यांचा विराेध असेल म्हणून  आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. शाळा पुन्हा सुरु व्हावी अशी अद्याप पालकांची मानसिकता नसल्याने पुणे मनपाने अशाप्रकारचा निर्णय घेतलेला आहे.

महत्वाच्या बातम्या –