विज्ञानाची किमया; प्रत्यारोपण केलेल्या गर्भाशयातून मुलीचा जन्म

विज्ञानाची किमया; प्रत्यारोपण केलेल्या गर्भाशयातून मुलीचा जन्म f8cd1206151b5584bc9d21c8bfd0327e

प्रत्यारोपण केलेल्या गर्भाशयातून देशातील पहिल्या मुलीचा जन्म झाला. नवरात्रीचा उत्सव सुरू असतानाच मुलीचा जन्म झाल्याने मुलाच्या जन्माचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

देशातील पहिले गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात 17 मे 2017 रोजी करण्यात आले. प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून जन्म घेणारे हे देशातील पहिले बाळ ठरले. जगभरामध्ये आतापर्यंत प्रत्यारोपित गर्भाशयातून 11 बाळांचा जन्म झाला आहे. त्यामुळे या पद्धतीने जगात येणारे हे 12 वे बाळ ठरले आहे.

याबाबत गॅलॅक्‍सी केअर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश पुणतांबेकर म्हणाले, “”रात्री १२ वाजून १२ मिनीटांनी सिझर करून प्रसूती करण्यात आली. त्या बाळाचे वजन १४५० ग्रॅम होते.

रुग्णालयात आतापर्यंत तीन गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. त्यापैकी प्रत्यारोपित केलेल्या एका गर्भाशयात बाळाची व्यवस्थित वाढ होत झाली.”

नवजात अर्भक तज्ज्ञ डाॅ संदीप कदम म्हणाले, ‘जन्नत: अर्भक व्वयवस्थित श्वास घेत आहे. त्याची काळजी योग्य प्रकारे घेण्यात येत आहे.’

विशेष म्हणजे या मुलीला तिच्या आईने गर्भाशय दान केले आहे. ज्या गर्भाशया आईचा जन्म झाला त्याच गर्भाशयातून तिने आपल्या मुलीला जन्म दिला.