…बघुयात सरपंचाचा अधिकार,पगार,कारभार,आणि संपूर्ण माहिती ; जाणून घ्या !

सरपंच

भारतात ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी पंचायत राज कायदा (Panchayat Raj Act) सुरु करण्यात आला त्याला स्थानिक स्वराज्य संस्था असे हि म्हणले जाते. हा कायदा १९९२ पासून लागू झाला स्थानिक स्वराज्य प्रणाली हि ३ प्रकारची असून ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्यात विभागली गेली आहे.

ग्रामपंचायत हे सर्वात महत्वाचे घटक असून ग्रामपंचायत चा जो प्रमुख असतो त्यांना आपण गावाचा प्रथम नागरिक तसेच सरपंच म्हणून ओळखतो.
तसेच गावातला संपूर्ण विकास करणे हि जबाबदारी सरपंचाची असते. पाच वर्षानंतर सरपंच पदासाठी स्थानिक पातळीवर निवडणूक(Elections at the local level) घेतले जातात.

तर बघुयात सरपंचाची निवड(Selection) कशी केली जाते !

सरपंच हा गावातील मतदारांद्वारे निवडून दिला जातो तसेच पंचायत राज कायद्यात(Panchayat Raj Act) सरपंचाला अनेक अधिकार दिले गेले आहे. सरपंचाला गावात एक विशेष महत्व दिले जाते.

सरपंचाची निवड(Selection) कशी होते घ्या जाणून –

सरपंच निवडण्याच्या आधी निवडणूक आयोग(Election Commission)गावातील लेखसंख्या गुणोत्तर पद्धतीने ST/SC/OBC साठी जागा निश्चित होते म्हणून ज्या वर्गासाठी निवडणूक आयोगाने जागा निश्चित केली आहे त्यांनाच सरपंच करावा लागतो.

कसे होता येते, सरपंच काय लागते पात्रता(Eligibility) ?

सरपंचाचे वय हे २१ वर्षांपुढील असावे व उमेदवाराचे नाव त्या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार हा पंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यात पात्र असावे. जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही. उमेदवार हा आठवी पास असणे आवश्यक आहे असे नियम आहेत.

सरपंचाला काय अधिकार(Rights) आहेत घ्या जाणून –

सरपंचाला ग्रामपंचायत व ग्रामसभा बैठक(Meeting) बोलावण्याचा अधिकार आहे, ग्रामपंचायत सभा बोलवल्यानंतर सरपंच मुख्यस्थानी असतो. तसेच ग्रामपंचायतीचे सर्व आर्थिक व कामाचे अधिकार हे सरपंचाकडे असतात. ग्रामपंचायत द्वारे गावात जर काही काम सुरु असेल तर देखरेख करण्याचा अधिकार सरपंचाकडे आहे.

सरपंचाचे अनेक कर्तव्य आहेत म्हणजेच गावाचा विकास,गावाची शांतात राखणे, विवाद भांडण ह्यांचे निराकरण, इत्यादी

सरपंचाने करावयाचे कार्य(Work) –

१ ) गावात विकासकामे राबवणे
२ ) गावातील रस्ता सुधारणे व त्याची देखभाल करणे.
३ ) सरकारी योजना राबवणे.
४ ) पशुपालनाला प्रोत्साहन देणे.
५ ) शिक्षणाचा गावात प्रचार
६ ) पाणी पुरवणे
७ ) अंत्यसंस्कार व स्मशान भावांची देखभाल करणे गरजेचे आहे
८ ) गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण पुरवणे
९ ) खेळाला प्रोत्साहन देणे इत्यादी.

घ्या जाणून सरपंचाचा पगार (Salary) –

गावकर्यांना पडणारा प्रश्न सरपंचाला पगार किती ? तर सर्पणाचा पगार हे राज्य सरकार निश्चित करते.
म्हणजेच हरियाणात ३००० रुपये महिना आहे व उत्तरप्रदेशात ३५०० हजार पगार आहे सर्व राजय्त वेग वेगळा पगार असतो.

महत्वाच्या बातम्या –