दूध उत्पादन वाढीसाठी गोंदिया जिल्ह्यातील २१९ गावांची निवड

दूध उत्पादन वाढीसाठी गोंदिया जिल्ह्यातील २१९ गावांची निवड cow

दूध देणाऱ्या गोवंशाकडून कृत्रीम रेतन करून त्यांची दूध क्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनाने एचवायआयव्ही या उपक्रमाची सुरूवात केली. या उपक्रमासाठी गोंदिया जिल्ह्यातील २१९ गावांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या फेरीत १०० व दुसऱ्या फेरीत ११९ अशा एकूण २१९ गावांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील देशी गाईंना फळवून त्यातून जन्माला येणाऱ्या गाई अधिक दूध देतील व जिल्ह्यात दुग्ध उत्पादन वाढेल.

प्रधानमंत्री आवास योजनेतून ग्रामीण भागात ४ लाख २१ हजार घरे

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य पशूसंवर्धन विभाग व जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी वंधत्व निवारण व कृती शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येते. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून वंधत्व निवारणाचे उपाय करून कृत्रीम रेतनाचे कार्य युद्धस्तरावर सुरू आहेत. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन हजार २१७ जनावरांचे कृत्रीम रेतन करण्यात आले आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी १ कोटी २० लाख रुपये अदा

३१ मार्चपर्यंत प्रत्येक गावातून गाई फळविण्याचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांना शेती परवडत नसल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, जास्त दूध देणाऱ्या जनावरांची संख्या वाढावी, यातून देशी गार्इंवर कृत्रीम रेतन करून जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निर्मिती करून त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक समाधान मिळवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला.