शेतकरी आक्रोश समितीतर्फे २ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप

पुणे  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेद्वारे शेतक-यांचा झालेला अपमान व कर्जमुक्ती प्रकरणी होत असलेली टाळाटाळ, शेतीमालाला हमीभाव आणि शेतक-यांच्या इतर मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ शेतकरी आक्रोश समितीतर्फे २ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संप करण्यात येणार, अशी माहिती समितीचे सदस्य शांताराम कुंजीर यांनी पत्रकार परिषदेत दिली.