ट्रॅक्टर पलटी होऊन नदीत कोसळल्याने सात ऊसतोड महिला कामगारांचा मृत्यू

बेळगाव येते एका पुलावरुन ट्रॅक्टर पलटी होऊन नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये सात महिला कामगारांचा मृत्यू झालाआहे. खानापूर तालुक्यातील इटगी जावळी बोगुर पुलावर ही दुर्देवी घटना घडली आहे.

गुगलने दिल्या नाताळ सुट्टीच्या शुभेच्छा!

यावेळी 15 हून अधिक महिला ऊसतोड कामगार ट्रॅक्टरवरुन बोगुर गावातून इटगीकडे जात होत्या. मात्र, बोगुर पुलावर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर थेट नदीत कोसळला या अपघातात सात महिला ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक महिला कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पासपोर्ट काढताय…?मग राहा सावध

घटनेची माहिची मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढल तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेत शांतव्वा बिझोरे,गुलाबी हुंचीकट्टी, तंगव्वा हुंचेन्नत्ती, नीलव्वा मुत्नाळ,अशोक केदारी, शांतवा अल्गोडी,  नागाव्वा मातोळे अशी मृत महिलांची नवे आहे.