तुळजापूर – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील गावांना भेटी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेतले आणि धीरही दिला. काल शरद पवार यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी दिल्या आहेत. काल तुळजापूर परिसरातील काक्रंबावाडी, लोहारातील सास्तुर, राजेगांव, उमरग्यातील कवठा, औसा तालुक्यातील उजनी, उस्मानाबादमधील पाटोदा, करजखेडा या गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेत शरद पवार यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.
अतिवृष्टीमुळे जमीन खरवडून गेली आहे. त्यामुळे या नुकसानीचे स्वरूप हे नेहमीपेक्षा मोठे आहे. याशिवाय काही ठिकाणी कुणाच्या विहिरी होत्या, कुणाच्या पाईपलाइन होत्या, कुणी ठिबक सिंचन व्यवस्था केली होती. अन्य काही साधनं होती, तीदेखील वाहून गेली आहेत याची पाहणीही शरद पवार यांनी केली.
एखाद्यावेळी अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई येते तेव्हा पीक जातं ते त्यावर्षीपुरतं. पण या संकटामुळे जमिनीची जी अवस्था झाली आहे त्यामुळे पुढची काही वर्षे पीकच घेता येणार नाही. अतिवृष्टीचे हे संकट संपूर्ण शेतीव्यवस्था आणि अर्थव्यवस्था उद्धवस्त करणारं संकट आहे असे शरद पवार म्हणाले. या संदर्भात मुख्यमंत्री आणि देशातील प्रमुख लोकांशी बोलून तातडीची मदत कशी देता येईल असा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या –
- पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! तुमच्याकडची नाणी विकून होऊ शकता लखपती
- रोज एक सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या
- ‘दही सोबत गुळाचे’ सेवन करा, होतील हे मोठे फायदे…..
- राज्यात वादळी वार्यासह मुसळधार पावसाची शक्यता