शरद पवार सोलापूर दौऱ्यावर

शरद पवार

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कालपासून 10 दिवसांच्या कडक लोकडाऊनला सुरुवात झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विनंतीवरुन पवारांनी दौऱ्याचे नियोजन केले. आरोग्यमंत्री राजेश टोपेही शरद पवार यांच्यासोबत आहेत.

सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे

उद्या जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार नगरसेविका आणि अधिकाऱ्यांसोबत ते जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी बैठक घेतील असं सांगण्यात येत आहे. दरम्यान सोलापूर शहरात 10 दिवसांचा लॉकडाऊन असल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये असं आवाहन सोलापूर शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी केलं आहे.

शरद पवार रविवारी सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी बारामतीतील ‘गोविंद बाग’मधील निवासस्थानाहून सोलापूरकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेही दौऱ्यात सहभागी झाले आहेत.

आरोग्यदायी जायफळ खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

शरद पवार हे सोलापूरमधील ‘कोरोना’च्या परिस्थितीचा आढावा घेऊन खबरदारी आणि उपाय योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पवारांच्या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

सोलापूरमध्ये संचारबंदीचा आजचा तिसरा दिवस असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सोलापूर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. एक लाख जणांची अँटीजन रॅपिड टेस्ट होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या मनुके खाण्याचे ‘हे’ फायदे

आरोग्यदायी लवंग खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे