वाइन उद्योजकांना अडचणीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार – शरद पवार

वाइन उद्योजकांना अडचणीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार - शरद पवार shrad

वाइन उद्योगाला मागील काही दिवसांपासून हलाखीचे दिवस आले आहेत. वाइन उद्योग व द्राक्ष उत्पादकांच्या हितासाठी लवकरच वाइन उद्योजकांना अडचणीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

नाशिकमध्ये द्राक्षउत्पादकांची अडीच कोटींची फसवणूक

याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह वाइन उद्योजकांची बैठक घेण्यात येईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. विंचूर  येथील वाइन पार्कमध्ये शुक्रवारी रोजी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते वाइन ग्रेप्सच्या क्रशिंगचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी अन्न नागरीपुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळाचे माजी अध्यक्ष जगदीश होळकर, प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे सुपुत्र वंचित आघाडीत ?

पवार म्हणाले, की वाइन उद्योग आणि द्राक्ष उत्पादकांच्या विकासासाठी मार्केटिंगसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. वाइननिर्मितीसाठी परदेशी वाण असल्यास शेतकऱ्यांचा विकास होईल. यासाठी नवीन वाण आयात करण्याचा प्रयत्न केले जातील. त्यामुळे वाइन विकसित होऊन शेतकऱ्यांच्या द्राक्षांना मागणी वाढेल. ज्या वाणाच्या वाइनला मागणी आहे, त्याच वाणांची लागवड करण्यासाठी शेतकरी पसंती देईल. यासाठी वाइन उद्योगातील प्रतिनिधींनीही पुढाकार घेऊन त्यांच्या समस्या सोडवून घ्याव्यात, असे पवार यांनी सांगितले.