उस्मानाबाद – परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेऊन त्यांना धीर देण्यासाठी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. त्यामुळे, महाविकास आघाडी सरकारचे प्रतिनिधित्व म्हणून ते दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भरीव मदत देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढतील अशी अपेक्षा केली जात आहे. तर, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सोलापूर जिल्ह्याचा आढावा दौरा करणार आहेत.
शरद पवारांनी आज उस्मानाबादमधील गावांतील शेतकऱ्यांची भेट व नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या या दोन दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात केली. तुळजापूरमध्ये पाहणी केल्यानंतर ‘येत्या 10 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. महाराष्ट्राला केंद्रानं मदत करावी’, अशी मागणी करणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहे.
पवारांनी शेतकऱ्यांना दिले संकटाशी लढण्यासाठी बळ
दीर्घ परिणाम करणारं हे संकट आहे. या परिस्थितीला तोंड देण्याची ताकत तुमच्यामध्ये आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांची ताकत नसते, तेव्हा सरकारची ताकत उभी करावी लागते. ती आम्ही उभा करू. केंद्राने राज्यांना मदत करायला पाहिजे. राज्याच्या मर्यादा आहेत. भूकंपाच्या वेळी मी काही दिवस या भागात फिरत होतो. त्यावेळी पैसे उभे केले. जागतिक बँकेतून पैसे आणले. महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा मदत केली होती अशी सांगितली.
महत्वाच्या बातम्या –
- पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! तुमच्याकडची नाणी विकून होऊ शकता लखपती
- राज्यात पुन्हा चक्रीवादळाच सावट; ‘या’ जिल्ह्यांना बसणार तडाखा
- एकट्या मुख्यमंत्र्यांनाच घराबाहेर पडल्यावर करोना होतो का ? दानवेंचा रोखठोक सवाल
- ‘या’ जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा