पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी विविध प्रकल्पाबाबत सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या इथेनॉल निर्मितीचे उपक्रम ते उत्तर प्रदेशच्या हाथरस प्रकरणावर भाष्य केलं.
“यावर्षी ऊसाचं क्षेत्र वाढलंय, त्यामुळं यावेळी आणि पुढील वर्षी या ऊसाचा गाळप कसा करायचा हा यक्ष प्रश्न आहे. त्यामुळे 25 ते 30 टक्के साखर उत्पन्न कमी करुन त्याऐवजी इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय आहे. केंद्र सरकारचे याबद्दलचे धोरण अनुकूल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इथेनॉल निर्मिती करण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही केंद्र सरकारच्या या आवाहनाचा अभ्यास केला आणि इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मी जे बोलतो ते विचारपूर्वकच बोलतो- शरद पवार
शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. ‘राज्यात फडणवीसांचे सरकार असताना चंद्रकांतदादा हे देखील मंत्री होते. त्यावेळी विधानसभेमध्ये एकमताने आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. तो ठराव पस केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे.’
‘त्यामुळे हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्याने केंद्राच्या विधी तज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. आरक्षणाचा ठराव महाराष्ट्र सरकारने आधीच मंजूर केल्याने तो आता महाराष्ट्र सरकारकडे नाही, तो राज्याच्या उच्च न्यायालयात स्थगित झालेला नाही, याच विस्मरण कदाचित चंद्रकांत पाटील यांना पडला असावा. त्यामुळे त्यांना वाटतं की मी असं का बोलतो? पण मी जे बोलतो ते विचारपूर्वकच बोलतो’ असं प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या –
- सोयाबीन खरेदीची ऑनलाईन नोंदणी १ ऑक्टोबरपासून होणार
- राज्यात पुढील ३ दिवस ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता
- राज्यात आज ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
- कापूस खरेदी हंगामाच्या दृष्टीने पूर्वतयारी सुरू – यशोमती ठाकूर