अहमदनगरमध्ये शेतक-यांवर पोलिसांचा गोळीबार; शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण

शेवगाव – उसाला ३१०० रुपये देण्यात यावा मागणीसाठी सुरु असणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करून हवेत गोळीबार केल्यामुळे शेवगाव परिसरात तणावाचे वातावरण आहे . पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भगवान विक्रम मापारी (जायकवाडी, पैठण) ,बाबुराव दुकळे (तेलवाडी,पैठण )हे दोन शेतकरी जखमी झाले आहेत . शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रस्त्यावर उतरुन जाळपोळ केल्यानंतर आंदोलनकर्त्या शेतक-यांवर व शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला.या कारवाईत एका शेतक-याच्या छातीत छरर्रा घुसल्याच समोर आलं असून त्याला शेवगाव येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.