आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणे यात शिवसेनेच नुकसान – चंद्रकांत पाटील

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

‘आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करणे यात आदित्य आणि शिवसेना या दोघांचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्यांनी तसे न करणेच योग्य ठरेल.असे मत भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

केंद्रात पूर्ण बहुमत मिळालेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा अतिशय चांगली आहे. ग्रामपंचायतींपासून दमदार यश पक्षाने मिळविलेले आहे. अशावेळी विधानसभेची निवडणूक स्वबळावरच लढली पाहिजे, असा दबाव पक्षातून आपल्यावर आहे का?

तशी भावना आणि दबावदेखील आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार हे नक्की आहे. अशावेळी युती झाली नाही तर सत्ता जाण्याचा धोका आहे. त्यामुळे युती ही केलीच पाहिजे आणि शिवसेनेच्या नेत्यांनाही या धोक्याची जाणीव असणे आवश्यक आहे. युतीची गरज त्यांनाही आहे. २०१४ मध्ये चारही पक्ष वेगवेगळे लढले. तेव्हा ते एकत्र आणि आम्ही वेगळे लढलो असतो तर कदाचित सत्ता आली नसती.

महत्वाच्या बातम्या –

काही लोक सोनिया गांधींना जाऊन भेटू शकतात, तर आम्ही विठ्ठलाला भेटण्यात हरकत काय?

केंद्र सरकारची परवानगी मिळताच, राज्यात कृत्रिम पाऊस पडणार – बबनराव लोणीकर

२४ तासांत महापुरामुळे बिहारमध्ये १२ जणांचा तर आसाममध्ये ११ जणांचा मृत्यू
Loading…