सांगली : शिवप्रतिष्ठानची ‘दुर्गामाता दौड’ सुरु

सांगली : नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील ‘दुर्गामाता दौड’ला आजपासून उत्साहात सुरुवात झाली. यंदा दौडमध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले. नवरात्र उत्सवानिमित्त नऊ दिवस शहरातील विविध भागातून ही दौड काढण्यात येते. यावेळी ठिकठिकाणी दौड आणि भगव्या ध्वजाचे औक्षण केले जाते. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे सुद्धा या दौडमध्ये सहभागी झाले होते.दौडच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त दौड मार्गावर तैनात करण्यात आला होता.

काय आहे ‘दुर्गामाता दौड’?
या दौडला 35 वर्षाची परंपरा आहे. नवरात्र उत्सव सार्वत्रिकपणे साजरा करण्यासाठी दुर्गामाता दौडची संकल्पना शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींनी पुढे आणली. तरुणांमध्ये धर्माविषयी जागृती व्हावी यासाठी 1982 साली संभाजी भिडे यांनी सांगलीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडला सुरुवात केली. या दौडनिमित्ताने शहरात नवरात्रोत्सवाची वातावरण निर्मिती केली जाते. मशाल, तलवारधारक, ध्वजधारक अग्रस्थानी असतात. ठिकठिकाणी घरासमोर रांगोळी काढून आणि औक्षण करून दौडीचे स्वागत करण्यात येते. शहरातील प्रमुख रस्त्यावरून दौड मार्गक्रमण करते. हजारो तरुण या दौडमध्ये शिवरायांचे नामस्मरण करीत सहभागी झालेले असतात. दसऱ्याच्या दिवशी या दौडची सांगता होते.

भिडे गुरुजींच्या अडचणीत वाढ, न्यायालयात हजर राहण्याचे आदेश