मोदी ट्रेनिंग देऊन खोटं बोलवून घेतात – उद्धव ठाकरे

मोदी ट्रेनिंग देऊन खोटं बोलवून घेतात - उद्धव ठाकरे shiv

नगर- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ट्रेनिंग देऊन पंतप्रधान मोदी खोटं बोलवून घेत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. आपल्याला खरे काय ते बाहेर आणायचे असल्याचेही त्यांनी सांगितले. मेळाव्यामध्ये शिवसैनिकांना संबोधित करण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी शिर्डी मंदिराचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी साई संस्थानच्या वतीने ठाकरे कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. साईबाबांचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला. या दौऱ्यात ठाकरे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला खुर्ची नको फक्त जनतेचं प्रेम हवं आहे. सत्तेत राहून जर त्यांच्या डोक्यावर बसून तुमची कामं करुन घेत असेल तर आणखी काय पाहिजे. सत्तेसाठी मी कधीच लाचार होणार नाही, लाचारी माझ्या वडिलांनी कधी शिकवलीच नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. काल (ता. 20) पंतप्रधान शिर्डीत येऊन 2019 ला आम्हीच येणार असे सांगून गेले. इथल्या लोकांशी त्यांनी मराठीत संवाद साधला मात्र, राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर असं विचारण ही लोकांची थट्टा आहे. साईबाबांचा आशिर्वाद सर्वांनाच आहे. त्यामुळे आपणही स्वबळावर सत्तेत येण्यास आशावादी असल्याचे त्यांनी सूचकपणे सांगितले. केवळ सत्ता आहे म्हणून शेपूट हालवणारा मी नाही तर हातातला चाबूक ओढणारा आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

सध्या खोटं बोल पण रेटून बोल अशी राजकीय स्थिती आहे. खाटं बोलून सत्तेत आलेले देशद्रोही आहेत अशा कठोर शब्दांत त्यांनी यावेळी भाजपवर टीका केली. साईबाबांच्या चरणी लोकांसाठी आशीर्वाद मागितला. मला खुर्ची, पदाची लालसा नाही. माता-भगिनी आणि बांधवाचे प्रेम मला कायम मिळावे, असा आशीर्वाद मी मागितला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान मोदी फक्त नाटक करतात. ही केवळ जुमलेबाजी आहे. राम मंदिरासाठी किती दिवस वाट पाहायचे. अनेक दिवसांपासून राममंदिरासाठी शिवसेना लढत आहे. आम्हाला पाणी देत असाल, दुधाला भाव देत असाल तर 500 वर्षे सत्ता देऊ. भाजपा सरकार खोटे बोलत आहे. खोटे बोलूनच त्यांनी सत्ता मिळवली. मंदिर नहीं बनायेंगे असे एकदाचे सांगून टाका, असेही ठाकरे म्हणाले.