शिवसेना करणार शेतकरी कर्जमाफीचं ऑडिट

टीम महाराष्ट्र देशा – राज्य सरकारची महत्त्वकांक्षी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमाफी योजनेचं ऑडिट शिवसेना करणार आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते स्वत: ऑडिटरच्या भूमिकेत राहणार आहेत. दिवाकर रावते राज्यातील सर्व जिल्ह्यात जाऊन कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठका घेणार आहेत.

28 जूनपासून रावते कर्जमाफीच्या आढावा बैठका घेण्यास सुरुवात करणार आहेत.कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला, किती शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत, याची शहानिशा करणार आहेत.28 जून रोजी नांदेड, लातूर तर 29 जून रोजी उस्मानाबाद, बीड जिल्हा दौऱ्यात कर्जमाफीचे ऑडिट करणार आहे.या ऑडिटच्या अहवालानंतर शिवसेना कर्जमाफीबाबतची भूमिका ठरणार आहे.