धक्कादायक! कोविडची लस घेतल्यानंतर ६८ वर्षीय नागरिकाचा दीड तासातच मृत्यू

धक्कादायक! कोविडची लस घेतल्यानंतर ६८ वर्षीय नागरिकाचा दीड तासातच मृत्यू 53277727 303

मुंबई – काल ८ मार्च रोजी मुबंईतील एका खाजगी रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रात ‘कोविड-१९’ लसीकरण सुरू होते. यावेळी एका ६८ वर्षीय नागरिकाने दुपारी ३.३१ वाजता कोविशिल्डची लस टोचून घेतली. मात्र, लसीची मात्रा दिल्यानंतर ते बेशुध्द झाले.

यामुळे त्यांना तातडीने आपत्कालीन परिस्थितीतील आवश्यक असलेले औषधोपचार करून त्वरीत त्याच रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात पुढील औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु. दुर्दैवाने सायंकाळी. ५.०५ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. सदर बाब पोलिस यंत्रणेला कळविण्यात आली व त्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला, अशी माहिती महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिली आहे.कोविड लसीकरणानंतर मुंबईत ही दुर्देवी घटना घडली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर अवघ्या दीड तासात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर महापालिकेने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची समिती नेमली असून या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे.

या जेष्ठ नागरिकाचे शवविच्छेदन आज ९ मार्च रोजी केले जाणार आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर अत्यंत आवश्यक बाब म्हणून लसीकरणानंतर घडणाऱ्या प्रतिकूल घटनेबाबतची चिकित्सा करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यकिय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची त्वरित बैठक आयोजित करण्यात येणार असून ही समिती मृत्यू बाबतची कारणमिमांसा करणार आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

महत्वाच्या बतम्या –