धक्कादायक! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात एकाच वेळी तब्बल ३० जणांना डेल्टा व्हेरियंटची लागण

धक्कादायक! राज्यातील 'या' जिल्ह्यात एकाच वेळी तब्बल ३० जणांना डेल्टा व्हेरियंटची लागण 853549 deltavirus

नाशिक – कोरोनाचा विषाणू हा सध्या अवघ्या देशासह जगाची डोकेदुखी ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच संभाव्य हानी टाळण्यासाठी राज्यासह देशभरात सध्या मोठ्याप्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तर आता दुसरीकडे जगभरातल्या सर्वच देशांनी आपापल्या देशातील कोरोना लसीकरणाची गती वाढवावी अन्यथा डेल्टा व्हेरिएंट अधिक जीवघेणा ठरु शकतो असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला होता.

मात्र आता राज्यातील नाशिक जिल्ह्यामध्ये डेल्टा व्हेरियंटने शिरकाव केला आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटने शिरकाव केल्यामुळे खळबळ उडाली आहे. एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचं समोर आले आहे. एकूण 155 सॅपल्स तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 30 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे.तर जिल्ह्यातील नांदगाव, सिन्नर, येवला, कळवण या तालुक्यातील गावात 28 जणांना लागण झाली आहे. तर नाशिक शहरात 2 रुग्ण आढळले आहे. सर्व रुग्ण हे आरोग्य यंत्रणांच्या निगराणीखाली आहे.

दरम्यान डेल्टा व्हेरिएंटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवं अन्यथा जगभरातील परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे असे जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या वर्षाच्या सप्टेंबर अखेर सर्वच देशांनी आपल्या किमान 10 टक्के नागरिकांना लस मिळेल यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या –