धक्कादायक ! शेतकरी झोपलेला असताना अंगावर टाकले उकळते तेल; शेतकऱ्याचा मृत्यू.

धक्कादायक

झोपलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर उकळते तेल(Boiling oil) टाकून खून करण्याची धक्कादायक(Shocking) घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये सापटणे ह्या गावात घडली.

सोलापूर –         जिल्ह्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली असून घरात झोपलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर उकळते तेल(Boiling oil) टाकून खून करण्यात आला. माढा तालुका सापटणे गावातील घटना असून मृत शेतकऱ्याचे नाव शहाजी गोविंद ढवळे आहे त्यांचे ५५ वर्ष वय होते. सदरील घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून गावात ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. समोर आलेल्या माहिती नुसार शहाजी हे सोमवारी दिनांक ६ रोजी आपल्या घरात झोपले होते. तेव्हा रात्री दोन च्या सुमारास त्यांची पत्नी अनिता ढवळे हे पाणी देण्यास गेल्या त्यादरम्यान घराचा दरवाजा उघडा करण्यात आला ह्याचा फायदा घेऊन दोन्ही गुन्हेगार घरात शिरले व शहाजी ह्यांच्या अंगावर उकळते तेल(Boiling oil) टाकले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला त्यांना उपचारासाठी नेण्यात आले परंतु त्यांचा तिथे मृत्यू झाला.

पाठपुरवठा करताना असे समोर आले आहे कि हि घटना जमिनीच्या आणि रस्त्याच्या वादातून झाली आहे सदरील घटनेचा टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संतोष ढवळे तसेच नरसिंह ढवळे ह्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –