धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित

आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना – एका बाजूला राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे तर दुसऱ्या बाजूला एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. थोड्याथोडक्या नाही तर आरटी पीसीआरच्या तब्बल 12 लाख 50 हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी, ’12 लाख 50 हजार पेक्षा अधिक सदोष असणाऱ्या RTPCR किट्स खरेदी करण्यात आल्या आहेत या खरेदीमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार देखील झालेला आहे,’ असा गंभीर आरोप केला होता. लोणीकर यांच्या आरोपानंतर अखेर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कबुली दिली आहे. 12 लाख 50 हजार किट्स या सदोष असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

‘जीसीसी कंपनीच्या टेस्टिंग किट्सबाबत एनआयव्हीचा रिपोर्ट येईपर्यंत त्या वापरण्यासाठी असमाधानकारक आहेत. या किट्सचा वापर निश्चितप्रकारे करण्यात येऊ नये. त्यामुळे या कंपन्यांच्या टेस्टिंग किट्स वापरु नये,’ असे स्पष्ट निर्देश राजेश टोपे यांनी दिले आहे.

‘सध्या एनआयव्हीच्या वतीनं टेस्टिंग किट्स वापरण्याच्या दृष्टीकोनातून पुरवठा करण्यात येणार आहे. येत्या काळात अशा घटना घडू नये म्हणून आपल्याला सातत्याने प्रमाणीकरण करणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या –