धक्कादायक : ‘या’ देशात कोरोनाने घातला धुमाकूळ एका दिवसात ‘एवढ्या’ रुग्णांची नोंद

कोरोना

नवी दिल्ली – ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याने जगभरात भीतीचे वातावरण निमार्ण झाले आहे. अनेक देशांनी ब्रिटनमधूने येणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घातली आहे.

दरम्यान,ब्रिटनमध्ये काल एका दिवसात 53 हजार 135 रुग्णांची नोंद झाली. जनुकीय रचना बदलेल्या नव्या कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वेगानं होत असून लंडनसह अन्य सर्व प्रमुख शहरांमध्ये कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

ब्रिटननं ऑक्स्फर्ड ऍस्ट्राझेनेकाच्या कोविड-19 वरील लशीच्या वापरला मंजुरी दिली आहे. ब्रिटननं परवानगी दिलेली ही दुसरी लस आहे. ब्रिटन सरकारनं 10 कोटी लशींची मागणी नोंदवली आहे. यापूर्वी फायझर-बायो एनटेक नं तयार केलेल्या कोविड-19 लशीलाही मंजुरी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे  ब्रिटनमध्ये आढळलेला जनुकीय रचना बदलेला कोरोना विषाणू आता अमेरिकेतही आढळून आला आहे. कोलोरॅडो राज्यातल्या एका 20 वर्षीय युवकामध्ये या नव्या प्रकारातला विषाणू आढळून आला आहे. या युवकानं परदेश प्रवासही केलेला नव्हता; त्याला आता विलगीकरणात ठेवण्यात आलं असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.

दरम्यान अमेरिकेत सुरू असलेल्या लसीकरण प्रक्रीयेबाबत नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडन यांनी ट्रम्प प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. ही प्रक्रिया नियोजित वेळापत्रकापेक्षा विलंबानं सुरू असल्याचा बायडन यांचा आरोप आहे.

महत्वाच्या बातम्या –