धक्कादायक : प्रदूषण करणारे सर्वाधिक ५ हजार ३०६ उद्योग पुणे विभागात

प्रदूषण

राज्यातील प्रदूषण करणाऱ्या एकूण उद्योगांपैकी धोकादायक विभागातील सर्वाधिक म्हणजे ५ हजार ३०६ उद्योग पुणे विभागात असून त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणावर धोकादायक कचऱ्याचीही निर्मिती होत असल्याचं २०१८-१९ च्या महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालात म्हटलं आहे.

दरम्यान सर्वाधिक धोकादायक विभागातील उद्योग तीन महिन्यात बंद करावेत असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादानं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळानं राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या सहाय्यानं या उद्योगांकडून गेल्या पाच वर्षांची नुकसान भरपाई वसूल करावी. ही नुकसान भरपाई ठरवताना या उद्योगांमुळे सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण आणि प्रदूषण प्रतिबंधक घटकांना होणारं नुकसान लक्षात घ्यावं असं हरित लवादानं म्हटलं आहे. पुण्यापाठोपाठ नाशिक आणि कोल्हापूरचा क्रमांक लागतो.

महत्वाच्या बातम्या –

नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाची तीन सदस्यीय समिती नेमून

प्रतिबंधित एचटी-बीटी बियाण्यांसाठी नेमलेल्या विशेष चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसांत सादर करणार -कृषिमंत्री