बुलढाणा – नाम विठोबाचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे. ज्ञानोबा तुकाराम, गणगण गणात बोते असा जयघोष करत आषाढीसाठी श्रींची पालखी पंढरपूरकडे आज सकाळी मार्गस्थ झाली. श्रींच्या पालखीबरोबर ७०० वारकरी पायवारी करत आहेत. पालखीच यंदा ५३ व वर्ष आहे. दोन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा माऊलींचा पालखी सोहळा आज वैभवी थाटात मार्गस्थ झालाय. भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय .
श्रींच्या पालखी सोहळ्याचा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी आणि वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी काल रात्रीपासूनच शेगावात भाविकांची गर्दी सुरु झालेली. संत गजानन महाराजांच्या पालखीला निरोप देण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते. पालखीच्या सोबत अनेक भाविकांनी सुद्धा अकोलापर्यंत वारी सुरु केलीय. गेल्या दोन वर्षापासून खंड पडलेला पालखीसोहळा आज पुन्हा सुरु झाला. त्यामुळे भाविकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आलाय. अभंगाचा मधुर आवाज, टाळ मृदुंगाचा गजर असे आल्हाददायी चित्र आज पाहायला मिळाले भक्तिभाव, भक्तीभावाचा हा अनुपम्य सोहळा डोळ्यात साठवण्यासारखा होता.
श्रींची पालखी शेगाववरून श्री क्षेत्र नागझरी मार्गे अकोला, वाडेगांव, पातूर, डव्हा, रिसोड, परभणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने एकूण ७५० किलोमिटर प्रवास करत आषाढ शु-९ शुक्रवार ०८ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामास पोहचेल. १२ जुलै पर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखीचा मुक्काम राहील आणि आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर आषाढ शु.१५ बुधवार १३ जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगांवकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल. ३ ऑगष्ट रोजी पालखी खामगाव मार्गे संतनगरी शेगाव(Shegaon)ला परत येईल.
महत्वाच्या बातम्या –
- कोरोना वाढल्याने शाळा पुन्हा बंद? शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाले कि..
- सावधान! शेतातील बांध कोरताय? काय आहे कायदा आणि शिक्षा; वाचा सवि
- …बघुयात सरपंचाचा अधिकार,पगार,कारभार,आणि संपूर्ण माहिती ; जाणून
- कोरोना आजार वाढवतोय पुन्हा देशाची चिंता ? देशभरात पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ.
- मोठी बातमी – महाराष्ट्र सरकार देणार ५० हजार रुपये ; वाचा सविस्तर!