टॅटू काढताना अनेक गोष्टींची घ्या काळजी, योग्य काळजी घेतली नाही तर…..

टॅटू काढताना अनेक गोष्टींची घ्या काळजी, योग्य काळजी घेतली नाही तर..... tatoo

आजकालच्या तरुणाईमध्ये टॅटूची प्रचंड क्रेझ आहे. मात्र या टॅटूच्या माध्यमातून अनेक आठवणी कायमस्वरुपी जतन करुन ठेवता येतात. त्यामुळेच बरेचसे जण आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव, किंवा जीवनातील एखादी महत्त्वाची तारीख टॅटूच्या माध्यमातून शरीरावर गोंदवून घेतात. परंतु टॅटू काढताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जर टॅटू काढताना योग्य काळजी घेतली नाही तर त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात.

‘या’ 5 पदार्थांनी वाढवा शरिरातील ब्लड प्लेटलेट्स

अॅलर्जिक रिअॅक्शन –टॅटू काढताना विविधरंगी ‘डाय’ वापरले जातात. या रंगांमध्ये ‘फेरस ऑक्साईड’ हा घटक असतो. फेरस ऑक्साईडचे वेगवेगळ्या तापमानाला वेगळे रंग मिळतात. काळा, गडद आणि फिकट चॉकलेटी, लाल आणि ‘टायटॅनियम डायऑक्साईड’पासून मिळणारा पांढरा अशा वेगवेगळ्या रंगांची शाई असते. टॅटू काढून घेणाऱ्याची त्वचा त्यातील ‘डाय’ला संवेदनशील असू शकते आणि त्यामुळे त्वचेवर अ‍ॅलर्जी येऊ शकते.

रक्तदान करताना अडथळा –टॅटू काढल्यानंतर जवळपास १ आठवडा कोणालाही रक्तदान करता येत नाही. कारण टॅटू काढताना वापरलेली शाई आणि घातक केमिकल्स आपल्या रक्तावाटे अन्य व्यक्तीच्या रक्तात मिसळू शकतात.

जाणून घ्या अननस खाण्याचे फायदे

त्वचाविकार –अनेकांची त्वचा ही सेंसिटीव्ह असते. त्यामुळे अशी त्वचा असणाऱ्यांनी टॅटू काढण्यापूर्वी आवश्यकती खबरदारी घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा टॅटूसाठी वापरलेल्या सुयांचा एकाहून अधिक ग्राहकांसाठी वापर केला जातो. त्यामुळे त्वचाविकार होण्याची शक्यता असते. एचआयव्ही, हिपेटायटिस ‘बी’, हिपेटायटिस ‘सी’ अशा आजारांचे संक्रमण होण्याची शक्यता असते.

एमआरआय चाचणी करताना समस्या –बऱ्याच जणांना असं वाटतं की टॅटू काढल्यानंतर एमआरआय चाचणी करता येत नाही. परंतु असं नाहीये. टॅटू काढल्यानंतरही एमआरआय चाचणी करता येऊ शकते.मात्र चाचणी झाल्यानतंर येणाऱ्या रिपोर्टमध्ये एमआरआयची प्रतिमा थोडी खराब येण्याची शक्यता असते.