पश्चिम वऱ्हाडातिला रेशीम पोहोचले कर्नाटकात

बुलढाणाच्या रेशीमच्या मागणीमध्ये दरवर्षी जवळपास १९ ते २० टक्क्याने वाढ होत असते. परंतू यंदा पश्चिम वऱ्हाडामध्ये रेशीमला मार्केटचा अभाव असल्याने येथील शेतकरी कर्नाटमध्ये रेशीमची विक्री करीत आहेत. त्यातही अत्यल्प दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून स्पष्टपणे दिसून येत आहे. एकट्या बुलडाण्या जिल्ह्यातच एक कोटी ७३ लाख २० हजार ६७५ रुपयांचे उत्पादन घेतल्या जाते. पश्चिम वऱ्हाडातील बुलढाणा, अकोला वाशिम जिल्ह्यातील हवामान कमी, अधिक प्रमाणात तुती लागवडीकरिता पोषक आहे.

‘स्ट्रेस’वर रामबाण उपाय

शासनाकडूनही तूती लागवड वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. राज्यात सरासरी १० ते १२ हजार एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली जाते. राज्यात १८ जिल्ह्यात तुती रेशीम तर गोंदीया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या चार जिल्ह्यात टसर रेशींमशेती योजनेस प्रोत्साहन दिले जाते. संपूर्ण राज्यात ८ लाख किलोपेक्षा अधिक रेशीम कोषाचे उत्पादन होत आहे.पश्चिम वऱ्हाडातूनही आता रेशीमचे उत्पादन वाढण्यास सुरूवात झाली आहे. परंतू येथे मार्केट मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कर्नाटकच्या मार्केटला रेशीम विक्री करावी लागत आहे.