बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने ढकलल्या पुढे

बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने ढकलल्या पुढे बाजार समित्यांच्या निवडणुका

बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई बाजार समितीची निवडणूक  वेळेत होणार आहे . तर पुणे आणि नागपूर बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी सहा महिने वाट पाहावी लागणार आहे. राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देण्याबाबतची कायदेशीर तरतूद मागील भाजप- शिवसेना सरकारने २०१७ मध्ये घेतली होती.

जाणून घ्या दालचिनीची पानाचे फायदे…

यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने महायुतीचा निर्णय बदलून पूर्वी प्रमाणेच विकास सोसायट्या आणि ग्रामपंचायतीतून सदस्य निवड पद्धतीस नुकतीच मान्यता दिली. या बदलासाठीचा राज्यपालांच्या सहीने वटहुकूम काढण्यात येणार आहे.

अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या तुरीच्या शेंगा काळवंडल्या

त्याबाबतचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला देण्यात आले आहेत. पुणे व नागपूर बाजार समित्यांच्या निवडणुकांबाबत उच्च न्यायालयाचे आदेश असल्यामुळे या बाजार समित्यांच्या निवडणुका अधिनियमातील सुधारित तरतुदीनुसार बाधित होणार असल्यास, ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याची सूचना देखील राज्य निवडणूक प्राधिकरणाला करण्यात आली आहे.