Skin Care | ‘या’ पद्धतीने मलाई वापरून हिवाळ्यात गुलाबासारखा फुलवा चेहरा

Skin Care | 'या' पद्धतीने मलाई वापरून हिवाळ्यात गुलाबासारखा फुलवा चेहरा

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये थंड वातावरण (Cold Weather) असल्यास कोरडेपणा सर्वत्र जाणवतो. या वातावरणामुळे त्वचेला (Skin) देखील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यामध्ये प्रामुख्याने त्वचेवरील कोरडेपणाची (Dry Skin) समस्या वाढते. बरोबर हिवाळ्यामध्ये कोरडेपणामुळे केसांमध्ये कोंडा (Dandruff) वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचा निरोगी (Healthy Skin) ठेवण्यासाठी आपण अनेक हिवाळी क्रीम्स आणि लोशन वापरत असतो. पण अशा परिस्थितीत त्वचेला दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टींची गरज असते.

या थंड वातावरणामध्ये आपल्या त्वचेला नैसर्गिक पद्धतीने मॉइश्चरायझ ठेवण्याची जास्त गरज असते. यामध्ये दुधाची मलाई एक सर्वोत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझ ठरू शकते. दुधाच्या वर एक थर म्हणून घट्ट होणारी मलाई त्वचेसाठी खूप पोषक असते. कारण यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, बायोटेक इत्यादी त्वचेला उपयुक्त असणारे गुणधर्म आढळतात. दुधावरची मलाई ही तुमच्या त्वचेसाठी पूर्ण अन्नसारखे काम करते. पुढील पद्धती वापरून तुम्ही दुधावरची मलाई त्वचेवर लावल्यास तुमची त्वचा निरोगी राहू शकते.

मलाई आणि हळद

तुमच्या त्वचेवर जर मुरुमांची समस्या असेल किंवा तुम्हाला तुमच्या त्वचेचा रंग सुधारायचा असेल, तर मलाई आणि हळद तुमच्या त्वचेसाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला अर्धा चमचा मलाईमध्ये चिमूटभर हळद मिसळावी लागेल. हे मिश्रण तयार झाल्यानंतर चेहरा व्यवस्थित धुवून घ्या. चेहरा व्यवस्थित धुतल्यानंतर हे मिश्रण चेहरा आणि मानेला लावा. साधारण वीस मिनिटे हे मिश्रण चेहऱ्यावर ठेवून चेहरा स्वच्छ धुवा. यानंतर चेहऱ्यावर क्रीम किंवा लोशन लावा. नियमित चेहऱ्यावर हळद आणि मलाई लावल्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवेल.

मलाई आणि मध

हिवाळ्यामध्ये तुम्हाला जर तुमची त्वचा पोषक आणि निरोगी ठेवायचे असेल, तर तुम्ही मलाई आणि मध यांचा फेसपॅक तयार करून चेहऱ्याला लावू शकतात. यासाठी तुम्हाला अर्धा चमचा मलाईमध्ये अर्धा चमचा मध मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण चेहऱ्यावर लावण्यासाठी चेहरा ताज्या पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. त्वचेवर धूळ किंवा तेल असल्यास फेसवॉश लावून चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर तयार झालेले हे मिश्रण चेहऱ्यावर त्याचबरोबर मानेवर 20 मिनिटे लावून ठेवा. 20 मिनिटानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. चेहरा धुतल्यानंतर तुमची नियमित क्रीम किंवा लोशन चेहऱ्यावर लावा. या हिवाळ्यामध्ये तुम्ही नियमित मलाई आणि मध यांचा फेस पॅक करून चेहऱ्यावर लावला तर तुमच्या चेहऱ्यावरील अनेक समस्या कमी होतील.

महत्वाच्या बातम्या