टीम महाराष्ट्र देशा: स्त्री असो वा पुरुष प्रत्येकालाच चमकदार (Glowing) आणि निरोगी (Healthy) त्वचा (Skin) हवी असते. त्यासाठी प्रत्येकजण बाजारामध्ये उपलब्ध असलेले महागडे प्रोडक्ट वापरतो. त्याचबरोबर चेहरा चमकदार बनवण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन विविध प्रकारचे फेशियल करत असतो. पण फेशियल आणि क्रीमचा प्रभाव संपतात चेहऱ्यावरील चमक देखील संपायला लागते. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नैसर्गिकरित्या त्वचा कशी चमकवायची याबद्दल माहिती सांगणार आहे.
एलोवेरा जेल आणि चंदन
त्वचेला नैसर्गिक पद्धतीने चमकण्यासाठी तुम्ही एलोवेरा जेल आणि चंदन पावडरने चेहऱ्यावर फेशियल करू शकतात. यासाठी तुम्हाला एलोवेरा जेलमध्ये चंदन पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यावी लागेल. त्यानंतर तयार झालेले हे मिश्रण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर ठेवून, सुकू द्या. हे मिश्रण जेव्हा पूर्णपणे कोरडे होईल तेव्हा चेहरा थंड पाण्याने धुवा. एलोवेरा जेल आणि चंदन पावडरचे हे मिश्रण नियमित चेहऱ्यावर लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढेल.
तांदळाचे पीठ, लिंबू आणि कोरफड
चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही चेहऱ्याला स्क्रब करू शकतात. स्क्रब करण्यासाठी तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेले महागडे स्क्रब विकत घेण्याची गरज नाही. कारण तुम्ही घरबसल्या तांदुळाचे पीठ लिंबू आणि एलोवेरा जेल वापरून स्क्रब तयार करू शकतात. यासाठी तुम्हाला तांदळाच्या पिठामध्ये लिंबाचा रस आणि एलोवेरा जेल मिक्स करून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यावर चेहऱ्याला लावून तुम्हाला पाच मिनिटे चेहऱ्याची मसाज करावी लागेल. या मिश्रणाने स्क्रब केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स निघून जातील. परिणामी तुमचा चेहरा चमकू लागेल.
मध आणि एलोवेरा जेल
चेहऱ्याला नैसर्गिक पद्धतीने निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही कोरफडीमध्ये मध मिक्स करून ते मिश्रण चेहऱ्याला लावू शकतात. हे मिश्रण चेहऱ्यावर लावल्यानंतर तुम्हाला गोलाकार पद्धतीने पंधरा मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावी लागेल. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर पूर्णपणे सुकल्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा. चेहऱ्यावर कोरफड आणि मध लावल्याने चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारू शकते.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Health Tips | ब्रश न करता पाणी पिणे आहे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या!
- Vinayak Raut | “फडणवीस हे रंग बदलणारी राजकीय औलाद”; विनायक राऊतांचा हल्लाबोल
- Rohit Sharma | रोहित शर्माच्या ऐवजी ‘हे’ खेळाडू बनू शकतात भारताचे कसोटी कर्णधार
- Ajit Pawar | शिंदे गट कामाख्या देवीच्या दर्शनाला कुणाचा बळी देणार काय माहित? – अजित पवार
- Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – चंद्रशेखर बावनकुळे