Skin Care Tips | ‘या’ घरगुती पद्धती वापरून पायावरील टॅनिंग करा दूर

Skin Care Tips | 'या' घरगुती पद्धती वापरून पायावरील टॅनिंग करा दूर

टीम महाराष्ट्र देशा: वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या त्वचा (Skin) ला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामध्ये प्रामुख्याने आपल्या त्वचेला टॅनिंग (Tanning) च्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आपण चेहऱ्यावरील टॅनिंग बद्दल नेहमी बोलत असतो. त्याचबरोबर चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी आपण अनेक उपाय देखील करत असतो. पण चेहऱ्यासोबत आपल्या शरीरावरील इतर भागही तितकेच महत्त्वाचे आहे. चेहऱ्यासोबत आपल्या हाता पायांना देखील टॅनिंगच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे चेहऱ्याबरोबरच हाता पायांवरील टॅनिंग दूर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पायांवरील काळेपणा म्हणजेच टॅनिंग कशी दूर करायची याबद्दल काही टिप्स सांगणार आहोत.

दुधाची मलई

पायावरील काळेपणा घालवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही दुधावरच्या मलाईचा उपयोग करू शकता. यासाठी तुम्हाला आंघोळीपूर्वी दुधाची मलाई पायाला अर्धा तास लावून ठेवावी लागेल. यामध्ये तुम्ही पायाला मलाई लावल्यावर हलक्या हाताने त्याची मसाज देखील करू शकता. अर्धा तासानंतर पायाला लावलेली मलाई धुवा. नियमित ही प्रक्रिया केल्याने तुम्हाला तुमच्या पायांमध्ये फरक जाणवेल.

दही आणि ओट्स

पायावरील टॅनिंग कमी करायचे असेल तर तुम्ही त्यासाठी दही आणि ओट्स यांच्या मिश्रणाचा उपयोग करू शकता. यासाठी तुम्हाला दही आणि ओट्स यांची चांगली पेस्ट बनवून घ्यावी लागेल. ही पेस्ट वीस मिनिटे पायावर लावून ठेवा. वीस मिनिटानंतर पायावरील ही पेस्ट धुवा. असे केल्याने तुमच्या पायावरील टॅनिंग कमी होईल.

बेसन आणि हळद

पायावरील काळवटपणा घालवण्यासाठी तुम्ही बेसन आणि हळदीचे मिश्रण बनवू शकता. बेसन आणि हळदीच्या मिश्रणाने तुम्ही पायावर झालेल्या टॅनिंगवर हलक्या मसाज करू शकता. तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन वेळा हळद आणि बेसनाचे मिश्रण पायाच्या टॅनिंगवर लावले तर तुम्हाला लवकरच तुमच्या पायामध्ये फरक जाणवेल.

पपई आणि मध

पपई आणि मध यांची पेस्ट तयार करून आठवड्यातून एक दोन वेळा पायांवर लावल्यावर पायांवरील काळेपणा दूर होऊ शकतो. पपई आणि मध यांचे मिश्रण पायावर लावल्यावर अर्धा तास राहू द्यावे लागेल. अर्ध्या तासानंतर पाय धुतल्यावर तुम्हाला तुमच्या पायाच्या रंगांमध्ये फरक जाणवेल.

लिंबू आणि साखर

पायावरील टॅनिंग दूर करण्यासाठी लिंबू आणि साखर हा एक सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. यासाठी तुम्हाला लिंबू आणि साखर यांची पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही तयार झालेली पेस्ट पंधरा मिनिटे पायावर लावून ठेवावी लागेल. पंधरा मिनिटानंतर ही पेस्ट पायावरून धुतल्यानंतर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये फरक जाणवेल. यानंतर तुमचे पाय सुंदर आणि मऊ देखील होऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या