Skin Care Tips | ‘या’ पद्धती वापरून मानेवरील काळेपणा करा दूर

Skin Care Tips | 'या' पद्धती वापरून मानेवरील काळेपणा करा दूर

टीम महाराष्ट्र देशा: वाढत्या प्रदूषणामुळे आपल्या त्वचेला (Skin) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आपली त्वचा जास्त खराब होते. त्याचबरोबर हात पाय आणि चेहऱ्यासह मानेवरही (Neck) घाण साचते. अशा परिस्थितीत आपण आपला चेहरा हात पाय साफ करतो पण अनेकदा मान स्वच्छ करायची राहून जाते. त्याचबरोबर अनेकदा आपण आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घेतो आणि मानेकडे दुर्लक्ष करतो. परिणामी मान काळी पडायला लागते. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मानेवरील काळवटपणा घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही तुमच्या मानेवरील काळेपणा हटवू शकतात.

हळद

हळदीचा पॅक आपण चेहऱ्यासाठी नेहमी वापरत असतो. चेहऱ्यासोबत तुम्ही हळदीचा पॅक मानेला स्वच्छ करण्यासाठी देखील वापरू शकता. कारण हळद स्किन व्हाइटनरचे काम करते. त्याचबरोबर हळद त्वचेवरील डेड स्किन काढण्यास मदत करते. परिणामी त्वचेचा रंग सुधारतो. त्यामुळे जर तुमची मान काळी झाली असेल तर तुम्ही हळदीचा पॅक मानेला लावू शकतात. यासाठी तुम्हाला हळदीमध्ये दही लिंबू आणि दूध मिसळून पॅक तयार करून घ्यावे लागेल. त्यानंतर तयार झालेला हा पॅक मानेवर तीस मिनिटे लावून ठेवावा लागेल. हा पॅक आठवड्यातून दोनदा लावल्याने तुमच्या मानेवरील काळेपणाची समस्या दूर होईल.

लिंबू

लिंबामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी उपलब्ध असते. विटामिन सी त्वचेचा रंग सुधारण्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे लिंबाचा रस मानेवर लावल्याने काळवटपणाची समस्या दूर होऊ शकते. यासाठी तुम्हाला लिंबू कापून त्यामधील रस बाहेर काढून घ्यावा लागेल. त्यानंतर लिंबाच्या रसामध्ये थोडंसं गुलाब जल मिसळावे लागेल. तयार झालेले हे मिश्रण रात्री मानेला लावून झोपा. सकाळी ते साध्या पाण्याने धुवा.

बटाटा

बटाट्याचा रस हा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे असे मानले जाते. कारण बटाट्यामध्ये देखील मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळते जे तुमच्या त्वचेला चमक देऊ शकते. त्याचबरोबर मानेवरील काळवटपणा हटवण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या रसाचा उपयोग करू शकता. यासाठी तुम्हाला बटाटा बारीक करून त्याचा रस काढून घ्यावा लागेल. हा पॅक मानेला लावून दहा ते पंधरा मिनिटे राहू द्यावा लागेल. दहा ते पंधरा मिनिटानंतर हा रस कोमट पाण्याने धुवा.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या