Skin Care Tips | हिवाळ्यामध्ये त्वचा चमकदार बनवण्यासाठी वापरा मधापासून बनवलेले ‘हे’ घरगुती फेस पॅक

Skin Care Tips | हिवाळ्यामध्ये त्वचा चमकदार बनवण्यासाठी वापरा मधापासून बनवलेले 'हे' घरगुती फेस पॅक

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये (Winter) आपल्याला अनेक त्वचेच्या समस्यांना (Skin Problem) सामोरे जावे लागते. कारण हिवाळ्यामध्ये वाढत्या थंडीमुळे त्वचेवर कोरडेपणाची समस्या (Dry Skin) दिवसेंदिवस वाढत जाते. अशा परिस्थितीत त्वचेची निगा (Skin Care) राखण्यासाठी तुम्ही अनेक बाजारात उपलब्ध असलेले उत्पादके वापरतात. पण अनेकदा त्याचे आपल्या त्वचेवर दुष्परिणाम होतात. अशा परिस्थितीत त्वचेला कोरडेपणापासून वाचवण्यासाठी आणि ओलावा देण्यासाठी तुम्ही मधाचा (Honey) वापर करू शकतात. मध हिवाळ्यामध्ये तुमच्या त्वचेला नैसर्गिक पद्धतीने चमकदार ठेवू शकते. कारण मधामध्ये अनेक औषधे गुणधर्म आहेत, जे  तुम्हाला आणि तुमच्या त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.

मध आणि पपई

हिवाळ्यामध्ये त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी पपई आणि मध यांचा फेस पॅक उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला पपईचे चार-पाच चौकोनी तुकडे घेऊन ते मॅश करून घ्यावे लागेल. पपई व्यवस्थित मॅश झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक चमचा मध मिसळून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करून घ्यावी लागेल. ही तयार झालेली पेस्ट दहा ते पंधरा मिनिटे तुम्हाला चेहऱ्यावर लावून ठेवावी लागेल. दहा ते पंधरा मिनिटे झाल्यावर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. पपई आणि मध हा फेसपॅक तुमच्या त्वचेला एक्स्प्लाईट आणि मॉइश्चराईज करण्याव्यतिरिक्त त्वचेचे रंगद्रव कमी करण्यास मदत करू शकतो.

मध आणि दही

हिवाळ्यामध्ये त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्ही त्वचेला दही आणि मध यांचा फेसपॅक तयार करून लावू शकतात. यासाठी तुम्हाला अर्धा कप दह्यामध्ये दोन चमचे मध मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर साधारण वीस मिनिटे लावून ठेवावे लागेल. हा फेसपॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरल्यास तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवेल. मध आणि दही या फेस पॅकने तुमच्या त्वचेवरील मुरुमांचा त्रास कमी होऊ शकतो. त्याचबरोबर मध तुमची त्वचा हायड्रेट ठेवून कोरडेपणाची समस्या दूर करू शकतो.

मध आणि दूध

हिवाळ्यामध्ये त्वचेवरील कोरडेपणाची समस्या दूर करून त्वचा निरोगी ठेवण्यासाठी दूध आणि मध यांचा फेस पॅक तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला दोन ते तीन चमचे मध आणि कच्चे दूध मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा मिनिटं ते चेहऱ्यावर आणि मानेवर लावून ठेवावे लागेल. तुम्ही मध आणि दूध या फेस पॅकचा दररोज वापर करू शकतात. या फेस पॅकच्या नियमित वापराने तुमची त्वचा कोमल आणि चमकदार होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या